Ad will apear here
Next
‘आयआरसीटीसी’चा शेअर बाजारात जोरदार प्रवेश
शेअरच्या किंमतीत दुप्पट वाढ; ३२० रुपयांवरून ६४४ रुपये भाव

मुंबई : किंमतीत दुप्पट वाढ नोंदवत इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कार्पोरेशन लिमिटेडच्या (आयआरसीटीसी) शेअरने सोमवारी शेअर बाजारात जोरदार प्रवेश केला. मुंबई शेअर बाजारात नोंदणी होताना ‘आयआरसीटीसी’च्या शेअरची किंमत ३२० रुपयांवरून ६४४ रुपये इतकी झाली. या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे एका दिवसात दुप्पट झाले. गेल्या दोन वर्षांत कोणत्याही शेअरला नोंदणी (लिस्टिंग) होताना अशी वाढ मिळाली नव्हती. 

‘आयआरसीटीसी’च्या ‘आयपीओ’मध्ये एका शेअरची किंमत ३१५ ते ३२० रुपये ठेवण्यात आली होती. शेअर बाजारात नोंदणी (लिस्टिंग) होताना, त्यात तब्बल १०१.२५ टक्के वाढ होऊन त्याची किंमत ६४४ रुपये झाली. त्यामुळे शेअर बाजारात ‘आयआरसीटीसी’ नोंदणीकृत झाल्यानंतर कंपनीचे भांडवल १० हजार ७३६ कोटी रुपये झाले आहे.

‘आयआरसीटीसी’चा आयपीओ ३० सप्टेंबर ते चार ऑक्टोबरदरम्यान खुला करण्यात आला होता. गुंतवणूकदारांनी याला प्रचंड प्रतिसाद दिला. ६३८ कोटी रुपये किंमतीच्या या आयपीओद्वारे साधारण दोन कोटी शेअर्स विक्रीसाठी खुले करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल ११२ पट अधिक मागणी झाली. केंद्र सरकारने आपला १०० टक्के हिस्सा असलेल्या ‘आयआरसीटी’मधील १२ टक्के शेअर्स ‘आयपीओ’च्या माध्यमातून विक्रीस खुले केले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZWUCF
Similar Posts
सेन्सेक्सची विक्रमी उच्चांकाला गवसणी मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) दोन एप्रिल २०१९ रोजी इतिहासात प्रथमच ३९ हजारांचा सार्वकालिक उच्चांकी टप्पा पार करून तो टिकवून ठेवण्यात यश मिळवले. याआधी २९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने ३८ हजार ९८९पर्यंत झेप घेतली होती. त्यानंतर दोन एप्रिल २०१९ रोजी सेन्सेक्सने ३९ हजारांचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठण्यात यश मिळवले
रेकोल्ड वॉटर हीटर कंपनीने पटकावला ‘सुपरब्रँड्स’ पुरस्कार मुंबई : भारतातील सर्वात मोठी वॉटर हीटिंग सोल्यूशन्स पुरवठादार रेकोल्डने ‘सुपरब्रँड्स’ हा पुरस्कार जिंकत आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला आहे. ऑनलाइन ग्राहक मतदान प्रक्रियेनंतर सुपरब्रँड म्हणून निवडला गेलेला रेकोल्ड हा वॉटर हीटिंग विभागातला एकमेव ब्रँड आहे. हा पुरस्कार आपल्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या ब्रँड्सनाच दिला जातो
युनियन बँक ऑफ इंडियातर्फे तीन नव्या योजना मुंबई : देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना शतकाहून जास्त काळ सर्वसमावेशक बँकिंग सेवा देणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाने सोमवारी १०१वा स्थापना दिन साजरा केला. या वेळी या बँकेतर्फे तीन नवीन सुविधा दाखल करण्यात आल्या.
‘उद्योगांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक’ पुणे : ‘अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून, लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language